न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १६ फेब्रु.) :- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या वीर जवानांना पिंपळे गुरवमधील सुष्टी चौकात मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, माजी नगरसेविका शोभा आदियाल, नगरसेवक नाना काटे, राजू मिसाळ, अतुल शितोळे , अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर, सचिन आवटे, मुकेश पवार पिंपळे गुरव मधील एकता व्यापारी संघ उपस्थित होते.











