न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दापोडी (दि. १६ फेब्रु.) :- जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे CRPF चे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला व यात आपले ४२ जवान शहीद झाले. त्या घटनेचा निषेध भारतीय जनता पार्टी, दापोडी च्या वतीने करण्यात आला.
दापोडी येथिल नरवीर तानाजी चौक येथे जैश-ए-महमंद दहशतवादी अतिरेकी संघटनेचा पुतळा जाळून, हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच CRPF च्या शहीद जवानांना केंडेल पेटून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ”पाकिस्तान मुर्दाबाद, अतिरेकी संघटनेचा निषेध असो” अशा घोषणा देण्यात आल्या.
”आता फक्त बदला घ्यावा व हा हल्ला जवानांवर नसून, तो आमच्या देशाच्या कुटुंबावर आहे”, अशी भावना विशाल वाळुंजकर यांनी व्यक्त केली. यावेळी पिंपरी चिंचवड शहर सचिव विशाल (आण्णा) वाळुंजकर, पिं. चिं. अल्प. सं. उपाध्यक्ष अमीर शेख, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष विशाल सातपुते, प्रभाग अध्यक्ष धर्मेंद्र क्षीरसागर, सहकार आघाडी सरचिटणीस दीपक चक्रनारायण, उत्तर भारतीय नेता राजजी मिश्रा, बजरंग दल प्रमुख आदित्य शिंदे, ख्रिस्ती समाज अध्यक्ष मंगेश बदक, शुभम सिल्व्हे, राजू कानडे, सामाजिक कार्यकर्ते राजू वाळुंजकर, अरविंद असुतकर, अक्षय वाळुंजकर, प्रल्हाद चार्य, प्रदीप वाळुंजकर आदि प्रमुख कार्यकर्त्यांनी या निषेध कार्यक्रमात सहभाग घेतला.











