न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रु.) :- काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवार (दि. १४) रोजी दुपारी ३/३७ मिनीटांनी भारताच्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर शुक्रवार (दि. १५) रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली.
त्यानंतर लगेचच मोदींनी वंदेभारत एक्सस्प्रेसला अगदी हसतमुख चेहऱ्याने हिरवा झेंडा दाखवित, तेथील अधिकाऱ्यांशी हसत गप्पाही मारल्या. एवढ्यावरच न थांबता त्यांनी जाहीर सभेत भाषणही केले. हे वर्तन भारताच्या पंतप्रधानास शोभनिय नाही, अशी टीका शिवसेनेचे युवराज दाखले यांनी केली आहे.
ते म्हणाले की, ”आज एकटा पडलेला पाकिस्तान हिन्दुस्तानात घुसून, आपल्या भारतावर भयंकर हल्ले करीत आहे. आदरणीय नरेंद्रजी मोदीसाहेब आपणास हातजोडुन विनंती करतो की, राजकिय विरोधाकांवरील हल्ले थांबवा आणि पाकिस्तानने केलेला हल्ला डोळे उघडे करून पहा.
आपण गांभीर्याने बदला घेण्याची जी भाषा केली आहे, ती कृतीत उतरवून दाखवण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानला ठोकुन काढा. आम्ही वंदनिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक व सर्वसामान्य जनता आपल्या सोबत आहोत”, असे प्रसिद्धीपत्रात युवराज दाखले यांनी म्हटले आहे.











