न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२२) :- “शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटी” या तुकाराम महाराजांच्या अभंगात महाराजांनी संतांचे वर्णन, संत महात्म्याचे लक्षण, चिन्हे य वर्णिले आहेत. या अभंगाचे विवेचन केले आहे. शब्दापेक्षा क्रिया जास्त महत्त्वाची आहे. ज्याच्याकडे शास्त्रसंस्कार नाही, जो सर्व विषय उपभोगत असतो, जो कुठल्याही नीती शास्त्रांचे नियम पाळत नाही; तो पामर आहे. शुद्ध, बीज, फळं, रसाळ, गोमटी हे सर्व शब्द महत्त्वाचे आहेत. बीज जर शुद्ध असेल तर फळं देखील शुद्ध. ज्याच्या मुखात अमृताची वाणी आहे तो संत समजावा, असे ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत म्हणाले.
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे आई-वडील हभप स्व. विठोबा सोनबा लांडे व स्व. इंदुबाई विठोबा लांडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त भोसरीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालय प्रांगणात तिसऱ्या दिवशी ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सुवर्ण मंदिर, श्री क्षेत्र भंडारा डोंगर जीर्णोद्धाराच्या मदतीसाठी श़शी आखाडे यांनी २५ लाखांची देणगी जाहीर केली.
कीर्तन महोत्सवाच्या आयोजनात ह.भ.प. पुरुषोत्तम महाराजांनी विशेष योगदान दिले. विलास लांडे, मोहिनी लांडे, विश्वनाथ लांडे, संगीता लांडे, हिराबाई मुंगसे, मिराबाई गोडसे, मिराबाई गुजर, विक्रांत लांडे, शुभांगी लांडे, विराज लांडे, कांचन लांडे, विनया मुंगसे, विशाखा शिंदे, लांडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
संस्थेचे सचिव सुधीर मुंगसे, खजिनदार व माजी नगरसेवक अजित गव्हाणे, विश्वस्त विश्वनाथ कोरडे, विश्वस्त व माजी नगरसेवक विक्रांत लांडे, सर्व विश्वस्त मंडळ, ह.भ.प.बाळासाहेब काशीद महाराज, माणिकराव जैद, प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक साकोरे यांनी तर आभार प्रदर्शन विलास लांडे यांनी केले.


















