न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२२) :- जून, जुलै महिना सुरू झाला की सुगरन पक्षी काटेरी शिंदीच्या झाडांची निवड खोपा बनवण्यासाठी करत असते. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पर्यावरण अभ्यासक विजय मुनोत, अर्चना घाळी, संतोष चव्हाण,अमोल कानू ,विशाल शेवाळे,तेजस सापरिया हे सिंधीच्या झाडांचे संवर्धन कसे करता येईल ह्यासाठी ग्रामीण परिसरात अभ्यास करत आहेत.
या संदर्भात पर्यावरण अभ्यासक व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती सोसायटी चे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, जुलै महिन्याच्या सुरवात विणकर किंवा सुगरण पक्षींचा विणीचा हंगाम सुरू होतो. नर पक्षी प्रजनन हेतू मादी आकर्षित करण्यासाठी काटेरी पाने असलेल्या झाडांचा शोध घेतो व जिथे अन्नासाठी खाद्य उपलब्ध होईल अश्या शेती जवळ असलेल्या ठिकाणी किंवा विहीर आणि वाहत्या पाण्याच्या ठिकाणी पानांच्या टोकावर आपला खोपा बनविण्यास सुरवात करतो. अर्धा खोपा झाल्यावर मादी पक्षी ते खोपायुक्त घर निवडते. व नंतर दोघेही काड्या व पानांच्या सहाय्याने खोपा बनवतात. बहुतांशी सुगरण पक्षी काटेरी पानांचे शिंदीचे झाड निवडतात. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून त्यामुळे त्यांच्या पिलांचे संरक्षण होते.
चाकणमधील आंबेठाण बिरदवाडी रत्याच्या कडेला बांध्यावर तीन चार शिंदीची झाडे डोलाने उभी आहेत. त्या झाडांवर सुगरण पक्षी खोपा बनविब्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. विणीचा हा काळ साधारण महिनाभर असतो. नंतर ह्यामध्ये मादी प्रजनन हेतु अंडी देते. वाढत्या शहरीकरणामुळे ह्या सुगरण पक्ष्यांसाठी निवारा म्हणून आवश्यक असलेली सिंधींची झाडे मात्र दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येत आहे. हे ह्या पक्ष्यांसाठी धोक्याची घंटा आहे.