न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रु.) :- महाराष्ट्र राज्य पैलवान ग्रुपच्या वतीने कोल्हापूर येथे भरवण्यात आलेल्या चितपट कुस्ती स्पर्धेत पिंपरी चिंचवड मधील थेरगावच्या वैभव बारणे याने बाजी मारत, हनुमंत केसरी किताब पटकवला. त्याने वारणेचा विकास पाटील याला अस्मान दाखवत चितपट केले.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू खासबाग मैदानात जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.
हनुमंत केसरी किताबाचा मानकरी ठरलेला वैभव बारणे हा मुळचा थेरगावचा असून, आपले वडील थेरगावचे पोलीस पाटील नामवंत मल्ल दिलीप बारणे यांच्याकडून लहानपणीच कुस्तीचे बाळकडू घेतले आहे. सध्या तो कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत वस्ताद मारूती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करत आहे.











