न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२२) :- खाद्य निगम विभागात नोकरी लावतो, असे आमिष आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला दाखवले. नोकरी लावण्यासाठी टप्प्याटप्प्यात आरोपींनी १८ लाख ९७ हजार रुपये घेतले. खोटे जॉइनिंग लेटर देऊन दोघांची फसवणूक केली.
ही घटना जुलै २०२१ ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान रावेत येथे घडली. महिलेने रविवारी (दि. १७) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद शंकर पवार (वय ३३), सागर शंकर पवार (वय २५), सुयोग किशोर चव्हाण (वय २७, तिघे रा. काळेवाडी), दीपेश शर्मा, राकेश मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विनोद पवार, सागर पवार, सुयोग चव्हाण या तिघांना अटक केली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.