न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रु.) :- जम्मु काश्मिर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना बोपखेलकरांच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी नागरिक, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन, शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली. श्रध्दांजली सभेचे आयोजन बोपखेल गणेशनगर रामनगर भागातील व शिवमल्हार स्थापना समितीच्या वतीने करण्यात आले होते.











