न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १७ फेब्रु.) :- आझाद मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लब, काळेवाडी ज्योतिबानगर यांच्या वतीने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष काळूराम नढे यांनी सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. सर्वांनी मेणबत्या पटवून शहिदांना अभिवादन केले. याप्रसंगी स्वीकृत नगरसदस्य विनोद तापकीर, हरेश नखाते, अतुल नढे, राजू शिंदे, शाम नढे, प्रमोद मोरे, बजरंग नढे, खंडू आव्हाड, गजानन नढे, महेश शिंदे, विशाल सकपाळ, अमोल नढे, जेष्ठ नागरिक पद्माकर जांभळे, गुरवकाका, डॉ. साळुंखे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .











