न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रु.) :- नगरसेवक शैलेश मोरे यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आझम पानसरे व शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड येथील एम्पायर इस्टेट येथे शनिवार (दि. १६) रोजी मोफत आरोग्य व रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी कार्यक्रमास सुरुवात होण्याआधी उपस्थित सर्व मान्यवरांनी सर्वप्रथम भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली.

या शिबिरात शहरातील अनुभवी व वरिष्ठ डॉक्टरांची टीम सहभागी झाली होती. यावेळी मधुमेह, रक्तदाब, दंत चिकित्सा, नेत्र तपासणी आदी आजारांवर रोगनिदान व उपचार करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरात महिला व पुरुष मिळुन तब्बल ८३ नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी अंध मुलांना व नागरिकांना अन्नदानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
या महाशिबिरात परिसरातील व प्रभागातील स्थानिक नागरिक तसेच नगरसेवक शैलेश मोरे यांच्यासह सर्व कार्यकर्ते, मित्र परिवार मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता.











