न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२२) :- महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार सूचना हरकतींसह अंतिम मतदार यादी गुरुवारी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आली. एकूण १४ लाख ८८ हजार मतदारांपैकी आक्षेपाधीन ८४ हजार मतदार स्थलांतरित करण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका निवडणूक याच मतदार यादीनुसार होणार आहे.
पिंपरी – चिंचवड लोकसभा मतदार महापालिका निवडणुकीची प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर हरकती आणि सूचनांसाठी मुदत देण्यात आली होती. विधानसभा आणि निवडणुकीतील यादीनुसार प्रभागनिहाय मतदार अंतिम करण्यात आली. नऊ हजार हरकती आल्याने महापालिकेला स्थळपाहणी करून अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी पाच दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार गुरुवारी मतदार यादी जाहीर होणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले होते. त्याबाबत दिवसभर उत्सुकता होती. मात्र, सायंकाळी उशिरा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.
निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी तयार केलेल्या मतदार यादीची फोड करून तीनच्या प्रभागानुसार प्रारूप मतदार यादी तयार केली. मतदार यादी तयार करताना मोठ्या प्रमाणात घोळ झाला. यामध्ये प्रारूप यादी तयार करताना क्षेत्रीय कार्यालयात संगनमत करून नावे यादीत टाकणे, त्यात अनेक बोगस मतदार असल्याचा आरोप भाजप, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने केला होता.