न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- सीबीएसई इयत्ता १० वी व १२ वीच्या निकालात चिंचवड येथील पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले व उत्कृष्ट कामगिरी केली आहे. १९६ विदयार्थी १० वीच्या परीक्षेला बसले होते त्यापैकी १२१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले व ७५ विद्यार्थ्यांनी ८० ते ८९ टक्के दरम्यान गुण मिळवले.
इयत्ता १० वी रुद्रानी वाडेलकर ९९.%, वेद जाधव ९८.२%, अर्णव याडनोपित ९८%, तमन्ना रागीट ९८%, इयता १२ वी सायन्स विभाग आशिष कुमार पांडा ९६.२% व उम्रा फातिमा ९६.२%,, आशिष पांडा ९६.२%, उमरा फातिमा ९६.२%, श्रावणी शिनगारे ९६%, इयत्ता १२ वी कॉमर्स विभाग अरुंधिती पाटील ९६.७%, सृष्टी अग्रवाल ९६.४%, साक्षी मित्तल ९६.२%, अशी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांची नावे व गुणांची टक्केवारी आहे.
पोदार स्कूल च्या प्राचार्या सौ शहनाज कोटार म्हणाल्या, कोविड महामारीच्या व्यत्ययानंतरही, पोदार स्कूलचा १००% हा उल्लेखनीय निकाल लागला आहे. हे सर्वांच्या मेहनतीचे एकत्रित यश आहे. गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांसमोर अनेक अडथळे येऊन देखील, हे मिळवलेले उत्तम यश पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे