- चिंचवडमध्ये अभियंत्याला धमकी; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- घरी असताना सहाय्यक अभियंत्याला खंडणी मागणारा फोन आला. उद्याचा सूर्य बघायचा असेल तर दहा लाख रुपये कॅश तयार ठेव, नाहीतर तुझ्या आयुष्याला कायमचा फूलस्टॉप लागेल, अशी धमकी देण्यात आली.
ही घटना गुरुवारी (दि. २१) रात्री नऊच्या दरम्यान घडली. संतोष दत्तात्रय सुवर्णकार (वय ४६ रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांकावरून बोलणाऱ्या ईसमा विरोधात तक्रार दिली आहे. पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.