न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२२) :- दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता. विवाहनंतर पती व त्याच्या घरच्यांनी पिडितेला त्रास देण्यास सुरुवात केली. तू महार आहेस आमच्या जातीची नाही. तूझ्यामुळे सगेसोयरे सतत आम्हाला बोलतात. म्हणत तिचा मानसिक व शारिरीक छळ केला.
तसेच घरात बोलणे बंद करत तिला कामात मदत करणे बंद केले. चारित्र्याचा संशय घेत आरोपीने पिडितेला शिवगाळ व मारहाण देखील केली. यावरून पोलिसांनी आरोपींवर कौटुंबिक हिंसाचार व अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला.
ही घटना २०१९ ते सप्टेंबर २०२१ या दरम्यान घडली. पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पती नितीन भारत गांधले (रा. चऱ्होली), सासू, सासरे भारत रघूनाथ गांधले, दिर गोकुळ भारत गांधले (रा. कळंब) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.