न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२२) :- सेक्युअर व्हॅल्यू लिमीटेड कंपनीचे फिर्यादी हे व्यवस्थापक असून ते ऑडिटचे काम करतात. २० जुलैला भोसरीतील इंद्रायणी नगरमधील एसबीआयच्या एटीएम मशीनचे ऑडीट करीत असताना त्यांना गैरप्रकार निदर्शनास आला.
कंपनीत काम करणारे दोन एटीएम एक्झीकेटीव्ह यांनी ९ जून ते २० जुलै या कालावधीत मशीनमध्ये भरणा करण्यासाठी दिलेली रक्कम ८१ लाख रुपयांपैकी साडेतीन लाख रुपये हे मशीनमध्ये न भरता परस्पर काढून घेत कंपनीची फसवणूक केली.
संतोष भगवान उदावंत (वय ४३ रा. हिंगणे) यांनी भोसरी पोलिसांत तक्रार दिली असून एटीएम एक्झीकेटीव अशोक गजानन पोतदार (वय अंदाजे ३९ रा. दिघी), भगवान अशोक थोरात (वय २२ रा.भोसरी) यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.