न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२२) :- दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले असून शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक संदीप काटे व उपाध्यक्षा अनिता संदीप काटे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
शिवम काकडे याने प्रथम क्रमांक (९६.२टक्के), रुचिर बऱ्हाटे द्वतीय (९५.६ टक्के) तर सिया भोसले या विद्यार्थ्यानीने ९५.४ % गुण मिळवित तृतीय क्रमांक मिळविला.
दरम्यान माजी महापौर माई ढोरे यांनी या शाळेला सदिच्छा भेट देऊन सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थेचे अभिनंदन केले. यावेळी सामजिक कार्यकर्ते जवाहर ढोरे, अनिता संदीप काटे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक संदीप काटे, निहारा काटे, लीना काटे, आरती जोंधळे, अनिता ज्ञानेश्वर काटे, प्राचार्या सुषमा उपाध्ये, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पलक गांधी, पालक, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.