न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी चिंचवड शहर ऑल इंडिया मजलिस‑ए‑इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
शहराध्यक्ष धम्मराज साळवे, महिला शहराध्यक्ष रुहीनाज शेख, पुणे जिल्हाध्यक्ष फैयाज शेख, सचिव कुतुबुद्दीन होबळे यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
आपला संयुक्त महाराष्ट्र बलशाली होण्याकरिता प्रत्येक नागरिकाने सज्ज असावे असे मत शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी व्यक्त केले .