न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२२) :- दापोडी येथील मैलाशुद्धीकरण प्रकल्प १५ ते २० दिवसापांसून बंद होता. प्रकल्पाच्या टँकमध्ये शेवाळे आलेले दुर्गंधीयुक्त पाणी साचले होते. त्यामुळे पवना नदीलगत राहणाऱ्या अनेक नागरिकांना दुर्गंधीचा त्रास करावा लागत होता. अखेर हा प्रकल्प सुरू झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पजवळ महावितरणचे काम सुरू होते; पण नियोजनशून्य काम सुरू होते. ट्रास्फार्मरच्या (रोहित्र) बाजूला अदांजे ६० फुटांची लांबी तर ४० खोल खोदाई केल्याने तो खचला होता. दुसरी पर्यायी व्यवस्थाच नसल्याने रोज २० दशलक्ष मैला १५ ते २० दिवस मैलामिश्रित पाणी थेट पवना नदीत मिसळत होते. नदी दुषित झाल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होत. सध्या प्रकल्प सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
















