न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२२) :- महिलेच्या शॉपवर आरोपी हा जानेवारी २०२२ पासून कामास होता. त्याला १४ जुलैपासून फिर्यदिने कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर तो पुन्हा रविवारी (दि. ३१) फिर्यादी महिलेच्या शॉपवर आला. त्याने या महिलेला पुन्हा कामावर घेण्याची विनंती केली.
मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला. त्यानंतर फिर्यादी फ्लॅटवर गेल्या असता आरोपी फिर्यादीच्या पाठीमागून फ्लॅटवर गेला. तेथे फिर्यादी सोबत गैरवर्तन करत विनयभंग केला. हा प्रकार रविवारी (दि. ३१) सकाळी पिंपळे निलख येथे घडला.
पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रितेश रोहिदास सातसमुद्रे (वय २०, रा. बालेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.