न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२२) :- पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त चिखलीतील विश्व हिंदु परिषद बजरंग दल आणि प्रखंड व्यापारी संघटना यांच्या वतीने सालाबादप्रमाणे चिखलीतील श्री. भैरवनाथ महाराज मंदिर ते घोरडेश्वर डोंगर पायी कावड यात्रेला आजपासून प्रारंभ झाला.
सकाळी आठ वाजता ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराज मंदिरात नारळ आणि पुजा करुन कावड यात्रा सुरु झाली. हजारोच्या संख्येने भाविक कावड यात्रेत सहभागी झाले होते, अशी माहिती माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी दिली.
















