न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रु.) :- पुणे ते लोणावळा दरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या लोहमार्गाचा अंतिम अहवाल तयार झाला असून, येत्या महिन्यात तो मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येणार आहे.
बोर्डाकडून याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर तो मंत्रिमंडळ समिती आणि निती आयोगाकडे मंजुरीसाठी जाणार आहे. या प्रस्तावासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असल्याने त्यांना हा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
यात ३ कोटी रुपये सर्वेक्षणासाठीचा खर्च होणार असून, एक वर्ष सर्वेक्षण कालावधी लागणार आहे. प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार असून, एकूण ४,८८० कोटी रुपये खर्च होणार आहेत.











