- सागर लांगे यांच्या निवडीने मावळ शिवसेनेत घमासान
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रु.) :- भाजपा प्रणित नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी व पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी सागर लांगे यांची निवड झाली आहे. त्यांना मुंबईतील कुर्ला या ठिकाणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष (कैबीनेटमंञी दर्जा) हाजी अरफात शेख यांनी नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे.
आज वाहतुकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून, त्यांची विश्वासाहर्ता जपणे ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने सर्वसामान्य वाहतुकदार व जनतेला अभिप्रेत असणारी वाहतूक सेना उभारली पाहिजे. एक वर्षाच्या काळात सर्वांना बरोबर घेऊनच काम करणार असल्याचे लांगे यांनी सांगितले.
सागर लांगे हे सुरवातीपासुनच हाजी अराफत शेख यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या संघटक कौशल्याने शिवसेनेमध्ये असताना देखील त्यांनी वजनदार कामकाज केलेले आहे. सागर लांगे यांनी नवभारतीय वाहतुक संघटनेची जबाबदारी स्विकारल्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मावळमध्ये शिवसेनेला आपला गड राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.











