न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२२) :- पोलीस गस्त घालत असताना त्यांना खबर मिळाली की, दोघेजण वाल्हेकरवाडी येथे चोरीची दुचाकी घेऊन थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे पोलिसांचा खोटा गणवेश व चोरीच्या ६ लाख ९६ हजार रुपयांच्या १४ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
पोलिसांनी त्यांचा पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी केवळ दुचाकी चोरल्या नाहीत, तर खोटा पोलीस गणवेश घालून नागरिकांना पोलीस असल्याची खोटी बतावणी करत त्यांची लूट केल्याचेही मान्य केले. यावेळी पिंपरी-चिंचवड तसेच पुणे आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात केलेले एकूण १० गुन्हे उघड झाले.
यात चिंचवड पोलीस ठाण्यातील पाच, सांगवी, फरसखाना व विमाननगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, तर निगडी पोलीस (Chinchwad Police) ठाण्यातील दोन गुन्हे उघड झाले असून जप्त केलेल्या चार दुचाकींच्या गुन्ह्यांचा शोध अजून पोलीस घेत आहे. दिपक नारायण बनसोडे (वय ३१, रा.देहुरोड) व श्रीमंत विनायक सुरवसे (वय २९ रा. चिंचवड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.












