न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रु.) :- पिंपरीतील (मोरवाडी) गृहबांधणी क्षेत्रातील आघाडीच्या मोरया असोसिएट्स या संस्थेच्या कार्यालयाचा नुकताच प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वर्धापनदिनी संस्थेस शुभेच्छ्या देण्यासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. राजेश पुणेकर, ॲड. योगेश थंबा व आदी मान्यवर उपस्थित होते, असे संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कडु यांनी सांगितले.











