न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रु.) :- स्वाभिमानी प्रबोधिनी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकतेच बीड येथे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात अपना वतन संघटनेच्या सामाजीक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष सिध्दीकभाई शेख यांना बीड जिल्हयाचे डी. वाय. एस. पी. खिरडकर, बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, हभप रामकृष्ण बापू रंधवे, स्वाभिमानी प्रबोधिनी महाराष्ट्र राज्य अध्यक्षा तथा आयोजक नंदा सारूख, कृष्णा बडे, शितल बडे, वारे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष सिध्दीकभाई शेख मनोगत व्यक्त म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक कामे केली. पण ती कामे करताना प्रसिध्दी कधी केली नाही. कारण यातून केवळ मिळणारे समाधान यातच सुख होते. स्वाभिमानी प्रबोधनीच्या राज्यस्तरीय पुरस्काराने नवा जोश आलाय, अजून खूप काही करायचं आहे.











