न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रु.) :- म्हेत्रे वस्ती चिखली येथील राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून रसिकांची दाद मिळवली.
यावेळी नगरसेविका साधना, अभिनेते दत्ता उबाळे, विद्युत सनियंत्रण समितीचे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर, बांधकाम व्यावसायिक मकरंद पांडे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व्यंकट वाघमोडे, उपाध्यक्ष मोहन देवकाते आदी उपस्थित होते. यावेळी उबाळे यांनी शालेय जीवनातच कलाकार घडतात, असे मत व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा, गोंधळ, तिरंगा सिनेमातील प्रसंग आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर प्रकाश टाकणारी नजरे आडचे गाव ही नाटिका सादर करून, रसिकांच्या टाळ्यांची दाद मिळवली. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले कोळी गीतावरील नृत्य आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले मल्हार.. मल्हार.. हे सादरीकरण विशेष ठरले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष वाघमोडे यांनी केले. सूत्रसंचालन रंजना आव्हाड तर आभार साधना यांनी मानले.











