न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रु.) :- जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला व यात आपले ४२ जवान शहीद झाले. त्या घटनेचा पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.
या दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मोशी प्राधिकरणातील प्रगती हार्मोनी हाउसिंग सोसायटीत भारतीय शहीद जवानांना आदरांजली वाहून, दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली. तसेच सोसायटीतील बालचमूंनी कैंडल मार्चमध्ये सहभाग घेतला. यावेळी गॅलक्सी किड्स प्री. प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका माधवी जनार्धन्न, सोसायटीचे सदस्य व परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते.











