न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२२) :- दुचाकीस्वार आळंदी रस्त्याने जात होते. आर्मी पब्लिक स्कुलसमोर भरधाव पीएमपी बसने दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकास्वाराचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.
महेश हरीभाऊ पाटोळे (रा. साई तिरुपती ग्रीन सोसायटी, वडमुखवाडी) असे मृत्यु झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सचिन रायनातलू (रा. वडमुखवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीएमपी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















