न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२२) :- देहु-आळंदी परिसरातील वजन काट्याजवळ फिर्यादी यांच्या वडिलांनी आरोपीला गट क्रमांक १९७ व १९८ येथील जमीन भाड्याने दिली होती. आरोपीला ही जमीन खाली करा असे सांगण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या आई तेथे गेल्या होत्या.
यावेळी आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने ढकलून दिले. हा प्रकार शुक्रवारी (दि. २६) घडला. ३६ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृष्णा शहा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.
















