न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२२) :- सायकलवरून कामाला जाताना चिंचवड येथे शुक्रवारी (दि. २६) सकाळी महावीर चौकात सायकल स्वाराच्या सायकलला भरधाव वेगात आलेल्या आरोपीच्या बल्कर टँकरने जोरात धडक दिली. यामध्ये ते खाली पडले.
टँकरच्या मागच्या चाकाखाली ते सापडले आणि त्याखाली ते चिरडले गेले. त्यांना जखमी अवस्थेत मदत न करता आरोपी पळून गेला. या अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू झाला. रवींद्र हिरामण थोरात (वय ५६) असे मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे.
त्यांच्या पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव रमेश सांगळे (वय २२, रा. पनवेल, मुंबई. मूळ रा. हिंगोली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
















