न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२२) :- वाकड कस्पटेवस्ती परिसरात गुरुवारी (दि. २५) एकजण पिस्तूल बाळगून फिरत आहे, अशी माहिती बातमीदाराकडून शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रितम वाघ यांना मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून गावठी पिस्तुल व पिस्तुलच्या मॅगझीनमधून एक जिवंत काडतुस असा एकूण २५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ऋषीकेश उर्फ मोन्या शामराव वाघोरे (रा. कस्पटे वस्ती वाकड) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात आर्म अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
















