न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२२) :- आकुर्डीतील खंडोबामाळ चौकात वाहतुक नियमन करत असताना थरमॅक्स चौकातून येणारी एक पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट नसणारी गाडी फिर्यादी वाहतूक पोलिसाला दिसून आली. फिर्यादींनी गाडी चालकाला हात दाखवून गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, गाडी चालकाने थेट गाडी फिर्यादींच्या अंगावर घातली.
फिर्यादी गाडीच्या बोनेटवर पडले असता आरोपीने त्यांना तब्बल ८०० मीटर पर्यंत फरपटत नेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी ५.३० च्या दरम्यान निगडीतील खंडोबामाळ चौकात घडला. पोलिस नाईक देवराम पारधी (वय ३६) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी भरत तुकाराम जैद (वय २८, रा.चिंबळी फाटा, खेड) याला ताब्यात घेतले आहे.
















