न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२२) :- रेनॉल्ट डस्टर कार कामानिमित्त नेली. ती कार तीन महिन्यांनंतरही फिर्यादीस परत केली नाही. फिर्यादी यांच्या १३ लाख ६४ हजार ४३५ रुपये किमतीच्या कारची परस्पर विल्हेवाट लावून अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार १५ मे ते २९ ऑगस्ट या दरम्यान निगडीतील यमुनानगर येथे घडला. जशवंत रावधन सिंगराव दळवी (वय ३४, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवेक कल्याण सोमवंशी (वय ३४) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.















