न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२२) :- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपीला २६ एप्रिल २०२२ रोजी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहरात आला.
भोसरी पोलीस त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांना ढकलून देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हा प्रकार सोमवारी (दि. २९) सायंकाळी दापोडीत घडला. पोलीस कर्मचारी सागर जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश विष्णू अडागळे (वय २५, रा. बापू काटे चाळ, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.















