न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२२) :- हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनीचे व्यावसायिक ८० गॅस भरलेले सिलेंडर पिकअपमध्ये भरून ठेवले होते. बुधवारी रात्री फिर्यादीने पिकअप त्यांच्या घराजवळ पार्क केला. रात्रीच्या वेळी बोलेरो पिकअपमधून आलेल्या पाच ते सहा चोरट्यांनी पिकअपमधून तीन लाख ५९ हजार ३६० रुपयांचे सिलेंडर चोरून नेले.
हा प्रकार बुधवारी (दि. २४) रात्री साडेसात ते गुरुवारी (दि. २५) सकाळी साडेदहाच्या दरम्यान मोरेवस्ती, चिखली येथे घडला. भिकचंद हिरालाल कात्रेला (वय ५२, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.















