न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२२) :- दारूसाठी पैसे हवे असल्याने पतीने बुधवारी (दि. २४) पत्नीशी भांडण केले. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र मागितले असता ते न दिल्याने त्यांना पटीने लाथेने मारहाण केली. यामध्ये त्या जखमी झाल्याने उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. ही बाब समजल्यानंतर पतीने घरातील सर्व औषधी गोळ्या खाल्या तसेच गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा प्रकार सांगवीत घडला.
हनाबाई सुभाष शिंपाळे (वय ५५, रा. सांगवी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुभाष शिंपाळे (वय ६०) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पतीचे नाव आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.















