न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२२) :- घराबाहेर कपडे वळत घालत असताना आरोपी तेथे आले. घरमालकाने त्याच्या बायकोसोबत फिर्यादीचा झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीशी भांडण केले. अश्लील वर्तन करीत जिवे मारण्याची धमकी दिली.
त्याच्या सतरा वर्षीय मुलानेही फिर्यादीला गळा दाबून मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना चिखली येथे घडली. महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर गुरुसिंग आवटे (वय ४५, रा. स्वप्ननगरी हौसिंग सोसायटी, मोरे वस्ती, चिखली) व एक अल्पवयीन मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल आहे.


















