न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रु.) :- स्थायी समितीच्या आठ सदस्यांची २८ फेब्रुवारीला मुदत संपणार आहे. त्यामुळे समितीत जाण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. २० फेब्रुवारीच्या महासभेत नवीन आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दोन जागेसाठी १६ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. राष्ट्रवादीचे संख्याबळानुसार ४ सदस्य नियुक्त झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपणार आहे.
राष्ट्रवादीकडून दोन जागांसाठी माजी महापौर वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, स्वाती काटे, विनया तापकीर, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, माजी विरोधी पक्षनेते शाम लांडे, विनोद नढे, जावेद शेख, राजू बनसोडे, रोहित काटे, संतोष कोकणे, मयूर कलाटे, समीर मासुळकर, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर यांचा समावेश आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यामधून कोणत्या दोघांची निवड करतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.











