न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. १९ फेब्रु.) :- पिंपळे सौदागर येथील निलेश काटे युवा मंच व परिसरातील सोसायट्या व नागरिकांच्या वतीने जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मेणबत्ती पेटवून निषेध करण्यात आला. यावेळी शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, भ्याड हल्ला करणा-या अतिरेक्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या.
त्यानंतर युवा नेते निलेश काटे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीत रामकृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सर्व शेतक-यांनी त्यांचे एक दिवसाचे उत्पन्न शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे.











