- रिक्षा चालकांचे नेते बाबा कांबळे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यामुळे रिक्षा चालकांमध्ये चैतन्य – गफार भाई नदाफ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२२) :- दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हा संदेश पुन्हा एकदा बुलंद करा. दिल्ली येथे होणारे रिक्षा टॅक्सी वाहतूकदारांचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करा. रिक्षा टॅक्सी व वाहतूकदारांची ताकद दाखवून राजकीय सत्तेला हादरा दिल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न सोडवण्यासाठी देशव्यापी संघटन उभारण्यासाठी चलो दिल्लीचा नारा बुलंद करा, रिक्षा चालक मालकांची ताकद दिल्ली येथे दाखवून द्या, असे प्रतिपादन रिक्षा चालकांचे नेते बाबा कांबळे यांनी कराड येथील रिक्षा चालकांच्या मेळाव्यात केले.
कराड येथे कृष्णा रिक्षा संघटनेच्या वतीने व शहरातील सर्व रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने कृष्णा कराड रिक्षा चालक-मालक संघटनाचे ऑफिस कराड या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते व वायरल मुख्यमंत्री बाबा कांबळे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यामुळे रिक्षा चालक व मालकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र हा नेहमी सामाजिक लढ्यासाठी अग्रभागी राहिला आहे. बाबा कांबळे यांनी सुरू केलेल्या देशव्यापी मोहीम यशस्वी होण्यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने सोबत आहोत. महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडवण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वर्गीय शरद राव व स्वर्गीय जॉर्ज फर्नांडिस यांच्यानंतर बाबा कांबळे यांच्या रूपाने देशाला गोरगरीब कष्टकरी जनता व रिक्षाचालकांना दूरदृष्टी असणारा नेता मिळाला आहे. व्हायरल मुख्यमंत्री म्हणून त्यांचा फोटो झळकल्यानंतर ते अधिक लोकप्रिय झाले व रिक्षाचालकांना आपलेसे वाटू लागले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व संघटना एकत्र होतील अशी परिस्थिती आहे. अभी नही तो कभी नही असे सर्वजण म्हणत आहेत. ही ऐतिहासिक लढाई आहे, असे कृष्णा कराड रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष गफार नदाफ म्हणाले.
कराड येथील कृष्णा रिक्षा संघटनेचे पदाधिकारी शहानवाज मुल्ला यांच्या नवीन बुलेटचे उद्घाटन व पूजन वायरल मुख्यमंत्री म्हणून बाबा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर बुलेट रॅली काढून कराड येथील प्रत्येक रिक्षा थांबल्यावर भेट देण्यात आली. रिक्षा स्टँडवर विविध ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यानंतर अतुल भोसले यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने धनाजी पाटील यांच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
या वेळी उपस्थित कृष्णा रिक्षा संघटनेचे दिनकर काशीद, दीपक गरड, रहीम पटेल, फारुख बागवान, जहांगीर सय्यद, अशोक पवार, मुख्तार नदाफ, विकास पाटील, शहानवाज मुल्ला, संजय लिपारे, सागर जाधव, सुनील पाटील, मुसा भाई शेख, आयुब नदाफ, बबलू मुल्ला, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
क्रांती रिक्षा स्टॅन्ड च्या वतीने सुनील पाटील व वसंत देवाडिगा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन बाबा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला, यानंतर श्री गणेशाची आरती देखील बाबा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली.
यानंतर सांगली येथील एकता रिक्षा स्टॉप या ठिकाणी मोठ्या संख्येने रिक्षाचालक व मालक एकत्र जमले होते. येथे देखील फेटा बांधून व फटाक्याची आतिश बाजी करत त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या हस्ते रिक्षा चालक मालकांना गोरगरीब कष्टकरी जनतेला अन्नधान्य अन्नदान वाटप देखील करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष रामभाऊ पाटील, कृती समितीचे महाराष्ट्र नेते फिरोज मुल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज,युवक जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आसिफभाई बावा, रणजित दादा सावडेऀकर, विक्रम सावडेऀकर, नगरसेवक मंगेश चव्हाण नगरसेवक अभिजित भोसले, बल्लुदादा केरिपाळे सामाजिक कार्यकर्ते सुयोग दादा सुतार जमीर रंगरेज सुरज (मामा) पवार, स्वामी बेल्लुळ (इचलकरंजी) रहीम पटेल (कराड) फारुख बागवान ( कराड) व सांगली येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा येथे देखील विष्णू जांभळे, अशोक खैरमोडे, व तेथील रिक्षा स्टॅन्डचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी यांनी देखील व्हायरल मुख्यमंत्री म्हणून बाबा कांबळे यांचे सातारा शहरात उत्साहात स्वागत केले. साताऱ्यातील मुख्य चौक असलेल्या राजवाडा येथील रिक्षा स्टॉप वरती त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर छत्रपती उदयन महाराज यांनी स्थापन केलेल्या गणेश मूर्तीची पूजा देखील बाबा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी सातारा शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.















