न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २० फेब्रु.) :- शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती. लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एलबीटी इंग्लिश मिडीयम स्कुल यांच्या संयुक्त विदयमाने छञपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. सतिश घरत हे होते. यावेळी माजी नगरसेविका अनिता तापकीर, संस्थेचे सचिव सागर तापकीर, युवा नेते सोमनाथ तापकीर, संस्थेचे संचालक राजू पवार, कय्युम शेख, राजाराम शेळके, सुनिल म्हस्के, मुख्याध्यापक शशिकांत वाखारे सर आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्यावर भाषणे व पोवाडे सादर केले. याप्रसंगी पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुञ संचालन बापू बल्लाळ सर यांनी केले.











