- प्राधिकरण नागरी समितीने तब्बल १० टनापेक्षा अधिक निर्माल्य केले जमा...
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२२) :- शहरातील प्रमुख चौकात वाहतूक नियमन असो की गणेश भक्तांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन संदर्भात सामाजिक प्रबोधन. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे ३५ एसपीओ, पोलीस मित्र निगडी ,शाहूनगर ,चिखली आणि चिंचवड विभागात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना बंदोबस्तास सहकार्य करत होते. चिंचवड मधील चापेकर चौक, पवना घाट चौक, रावेत घाट, गणेश तलाव, हुतात्मा चौक प्राधिकरण, शाहूनगर ,चिखली येथे पोलिसांसमवेत बंदोबस्तात सहभाग घेतला.
नवव्या आणि दहाव्या दिवशी विसर्जनानंतर घाट परिसर स्वच्छ मोहीम राबवून १० टनापेक्षा जास्त निर्माल्य जमा करण्यात आले. तसेच प्लास्टिक कचरा संकलन करून पालिकेच्या सूचनेप्रमाणे जमा करण्यात आले. गणेश तलाव, शाहूनगर परिसरातील नागरिकांना मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले.
निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे म्हणाले, “गेल्या १५ वर्षांपासून निगडी व शहर परिसरात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पोलिस मित्र, एसपीओ पोलीस यंत्रणेला गणेशोत्सव काळात बंदोबस्तकारिता सहकार्य करत असताना मी पहात आलो आहे. सामाजिक संस्थेच्या वतीने अनेक वर्षांपासून सातत्याने अशी मदत पोलीस प्रशासनास मिळणे नक्कीच कौतुकास्पद आहे.”
निगडी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षिका विजया कारंडे म्हणाल्या,” निगडी हद्दीत सार्वजनिक मंडळांनी अतिशय शांततेत गणेश विसर्जन संपन्न केले. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पोलीस मित्रांचे गणेशोत्सव काळात चांगले सहकार्य मिळाले. निगडी हद्दीतील घरघुती गणेश उत्सव साजरा करण्या-या अनेकांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला. तसा बदल शेवटच्या विसर्जन मिरवणुकीत दिसून आला.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” समितीचे एसपीओ पाचव्या दिवसापासूनच गणेश विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करीत आहेत. यंदाच्या गणपती उत्सवात प्लास्टिकचा वापर कमी जाणवला तसेच मूर्ती दानातही वृद्धी दिसून आली. शाडूच्या मातीच्या गणपतींची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळे शहरातील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांची वाढती संख्या नक्कीच आनंद देवून जात आहे.”
गणेश विसर्जन बंदोबस्तास समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनखाली अर्चना घाळी, विजय मुनोत, बाबासाहेब घाळी, विशाल शेवाळे, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले,अजय घाडी, सतीश मांडवे, नितीन मांडवे,तेजस सापरिया,रामेश्वर गोहिल, बळीराम शेवते, विजय जगताप,उद्धव कुंभार, संदीप सकपाळ, मंगेश घाग, गौरी सरोदे, विभावरी इंगळे, राजू येळवंडे,शशिकांत इंगळे,संजय महाजन, संजय कांबळे, प्रकाश पानस्कर, राजाराम चव्हाण, समीर पुराणिक, संजय थोरात, भरत उपाध्ये, कडूबाळ शिंदे, संजय लोखंडे, सुरेश गावडे, राजेश हजारे यांनी प्रमुख म्हणून सहकार्य केले.
















