न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२२) :- निगडी ते वाघोली या पीएमपीच्या ई-बसमधून महिला आणि त्यांची बहीण या दोघी प्रवास करत होत्या. दोघीजणी पिंपरी चौकातून बसमध्ये चढल्या. त्या नाशिक फाटा येथे उतरल्या असता त्यांच्या पर्समधून एक लाख ९९ हजारांचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले.
हा प्रकार शुक्रवारी (दि. ९) दुपारी पिंपरी चौक ते नाशिक फाटा, कासारवाडी या दरम्यान घडला. महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















