न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२२) :- बिल्डिंग मटेरिअल खरेदी करण्यासाठी आरोपीला १३ लाख ५८ हजार ५०० रुपये दिले होते. दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांना बिल्डिंग मटेरियलची ऑर्डर दिल्यानंतर निम्मेच मटेरियल दिले. मात्र, उर्वरित मटेरियल व पैसे परत न देता फिर्यादी यांची सहा लाख ५८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली.
ही घटना पिंपळे गुरव येथे घडली. अरुण श्रीपती पवार (रा. भगवंत सिंग चौक, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष सुरेश काकडे (रा. राहिंज वस्ती, लोणी काळभोर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
















