- पथकात आशा स्वयंसेविकांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरात क्षयरोग रुग्ण शोध मोहीम मंगळवार (दि. १३) सुरू झाली आहे. शनिवार व रविवार हे दोन दिवस वगळून १४ दिवस मोहीम राबविणार आहे. निदान न झालेल्या क्षय रुग्णास शोधून त्यांना उपचारासाठी घेऊन येणे, रोग संसर्गाची साखळी खंडित करून रोगास प्रतिबंध करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
मोहिमेअंतर्गत शहरातील ७८ हजार घरांमधील १०७ अतिजोखमीच्या ३ लाख ९० हजार जणांची तपासणी होईल. दररोज एक टीम ३० घरांची पाहणी करणार आहे. झोपडपट्टी व वसाहतीतील भागात मोहीम राबविली जाईल. मोहिमेसाठी २५८ जणांची टीम आहे. यात आशा आणि पुरुष स्वयंसेवकांचा समावेश आहे. दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला असलेल्यांची संशयित क्षय रुग्ण म्हणून नोंद होईल. थुंकीची आणि क्ष – किरण तपासणी होईल.
सद्यःस्थितीत शहरात १७०० रुग्ण उपचार घेत असून ३१ ऑगस्टअखेर हे सापडले आहेत. मोहिमेदरम्यान क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास थुंकीचे नमुने घेऊन आवश्यकतेनुसार छातीचे एक्स-रे काढण्यात येतील. कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास प्राथमिक तपासणी होणार असल्याचे शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर यांनी सांगितले.
नियमितपणे क्षयरोगाचे रुग्ण शोधण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात येते. कोरोना काळातही मोहीम राबविण्यात आली. परंतु कोरोनामुळे मोहीम राबविण्यास मर्यादा होत्या. यंदा कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.










![[क्षयरोग]*** पिंपरी चिंचवड शहरात १४ दिवस क्षयरोग रुग्ण शोध मोहीम..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/download-18-90x60.jpg)
![[क्षयरोग]*** पिंपरी चिंचवड शहरात १४ दिवस क्षयरोग रुग्ण शोध मोहीम..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/download-2-11-90x60.jpg)



