न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील सफाई कामगार ३३४ दिवस विनापरवाना गैरहजर राहिल्याने वेतनवाढ रोखली आहे.
याबाबतचा आदेश तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी जारी केला आहे. हा कामगार ऑगस्ट २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत तब्बल ३३४ दिवस विना परवाना गैरहजर राहिला.
आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असताना कामावर हजर राहिला नाही. विभागीय चौकशीत दोषी आढळल्याने त्यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तसेच यापुढे विना परवाना गैरहजर राहिल्यास कार्यालयीन कामकाजात गैरवर्तन केल्यास शिस्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा ढाकणे यांनी दिला आहे.











![[वेतनवाढ रोख]*** वायसीएम रुग्णालयातील सफाई कामगाराच्या वेतनवाढीवर रोख...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/download-1-11-90x60.jpg)
![[वेतनवाढ रोख]*** वायसीएम रुग्णालयातील सफाई कामगाराच्या वेतनवाढीवर रोख...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/download-4-10-90x60.jpg)





