न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२२) :- बालाजीनगर झोपडपट्टी येथे राहणारी एक महिला गांजा विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (दि. १६) दुपारी एकच्या दरम्यान कारवाई करून महिलेला अटक केली.
आरोपी महिलेकडे २१ हजार ३७५ रुपये किमतीचा ८५५ ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा महिलेने आनंद उर्फ आप्पा काळे (रा. परंडा रोड, कुर्डूवाडी, जि. सोलापूर) याच्याकडून विकत आणला.
सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.