न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२२) :- ग्रामपंचायतीच्या लेखा परीक्षणामध्ये अनियमितता न दाखवणे तसेच वसुलीचा रिपोर्ट न पाठविण्यासाठी आरोपी सहायक लेखा परीक्षक अधिकाऱ्याने फिर्यादी ग्राम विकास अधिकाऱ्याकडे ३० हजारांची लाच मागितली. त्याबाबत फिर्यादी यांनी एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीने गुरुवारी (दि. १५) सायंकाळी सहा ते शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पीसीएस चौक, आळंदी येथे सापळा लावून आरोपीला लाच घेताना रंगेहाथ पकडले.
ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ परशुराम जगदाळे (वय ५५, रा. राजगुरूनगर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेश एकनाथ म्हात्रे (वय ४२, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या सहायक लेखा परीक्षक अधिकाऱ्याचे नाव आहे.


















