न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करीत केंद्र सरकारचा निषेध केला.
शनिवारी (दि. १७) चिंचवडगावातील चापेकर चौक येथील आंदोलनात पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, प्रदेश सरचिटणीस अनिकेत अरकडे, एनएसयूआय प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, शहर सरचटणीस सौरभ शिंदे, अपूर्वा इंगोले, गौरव चौधरी, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, जय ठोंबरे, अजित पवार आदींनी केंद्र सरकारचा निषेध करणारे फलक हातात घेऊन घोषणा देत आंदोलन केले.