न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२२) :- पतीने दारू पिऊन वेळोवेळी पत्नीला मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ केला. त्याला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजूषा पुट्टे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांचे वडील संजीवकुमार मोहनराव वल्लापे (रा. मरकल, ता. बिदर, कर्नाटक ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती आकाश चंद्रकांत पुट्टे (वय २६, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.